06 December Dinvishesh | ०६ डिसेंबर दिनविशेष

06 December Dinvishesh | ०६ डिसेंबर दिनविशेष

Babasaheb Ambedkar, बाबासाहेब आंबेडकर, महापरिनिर्वाण दिन, techunger, Saurabh Chaudhari
माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

MAHAPARINIRVAN
BR Ambedkar, डॉ बाबासाहेब आंबेडकर, mahaparinirvan,
महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता व त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.

----------------------------

Babasaheb Ambedkar

Babasaheb Ambedkar techunger saurabh chaudhari MAHAPARINIRVAN
DOWNLOAD

६ डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. दलित समाजासाठी तसेच सर्वसामान्य माणसासाठी त्यांनी संविधानामध्ये अनेक तरतुदी करून दिल्या म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार देखील म्हणतात. त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील दादर मध्ये त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे दरवर्षी २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात.
----------------------------

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे sketch


MAHAPARINIRVAN
Xera tech, Ambedkar poster, by TecHunger

happy Birthday jaddu

Jadeja, Ravindra Jadeja, Birthday, saurabh chaudhari, techunger



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या