20 January dinvishesh | २० जानेवारी दिनविशेष

20 January dinvishesh | २० जानेवारी दिनविशेष 20 January dinvishesh | २० जानेवारी दिनविशेष

२० जानेवारी दिनविशेष, जन्म मृत्यू, ऐतिहासिक घटना

२० जानेवारी दिनविशेष

२० जानेवारी जन्म

20 जानेवारी 1775 फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे-मरी अम्पियर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १८३६)
20 जानेवारी 1861 मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.
20 जानेवारी 1871 ratanji tata,20 january टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
20 जानेवारी 1889 महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.
20 जानेवारी 1898 नात मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९७४)
20 जानेवारी 1930 buzz aldrin,20 january चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.
20 जानेवारी 1960 १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा जन्म.
20 जानेवारी 1891 हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
20 जानेवारी 1936 युनायटेड किंगडमचा राजा जॉर्ज पाचवा यांचे निधन. (जन्म: ३ जून १८६५)
20 जानेवारी 1951 समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
20 जानेवारी 1980 दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
20 जानेवारी 1988 khan abdul gaffar khan,20 january स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)
20 जानेवारी 1993 अँग्लो-डच अभिनेत्री आँड्रे हेपबर्न यांचे निधन. (जन्म: ४ मे १९२९)
20 जानेवारी 2002 रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचे निधन. (जन्म: १० मे १९१८)

२० जानेवारी ऐतिहासिक घटना

20 जानेवारी 1788 इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
20 जानेवारी 1841 युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
20 जानेवारी 1937 फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
20 जानेवारी 1944 दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.
20 जानेवारी 1948 महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्‍न झाला.
20 जानेवारी 1957 bhabha atomic research centre,20 january आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
20 जानेवारी 1963 चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
20 जानेवारी 1969 क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.
20 जानेवारी 1998 संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.
20 जानेवारी 1999 गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
20 जानेवारी 2009 अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.

join techunger om whatsapp, get daily updates from techunger, saurabh chaudhari, techunger

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या