All posters created by saurabh chaudhari and team TecHunger
थोप टीव्ही चा निर्मात्याला महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून अटक.
थोप टीव्ही चा निर्मात्याला आज १४ जुलै रोजी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली. सतीश वेंकटेशवारलू असं या २८ वर्षीय इंजिनियरचं नाव आहे. सतीशला सोमवारी तेलंगणच्या राजधानीमधून अटक करण्यात आली आहे. सतीशला मुंबईमध्ये आणण्यात आलं असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर खात्याने हैदराबादमधील एका आयटी इंजिनियरला अटक केली आहे. सतीशने ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पायरेटेड कंटेंट उपलब्ध करुन देणारे मोबाइल अॅप्लिकेशन निर्माण केले आणि त्यामागील सर्व कारभार तो पाहत असल्याचा आरोप आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबरच सॅटेलाइट चॅनेल्सवरील जवळजवळ सर्वच कंटेंट उपलब्ध असणाऱ्या आणि नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या थोप टीव्हीच्या निर्मात्याविरोधात ही कारवाई करण्यात आलीय.
व्हायकॉम १८ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सह इतर ब्रॉडकास्टींग कंपन्यांनी महाराष्ट्र सायबर सेलकडे या अॅप्लिकेशनविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आमची परवानगी न घेता या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही निर्माण केलेला कंटेट टेलिकास्ट केला जात असल्याची तक्रार या निर्मात्यांनी केलेली. युझर्सला सध्या या अॅपचा सर्व्हर उपलब्ध होत नाहीय. या मोबाइल अॅप्लिकेशनमुळे आमच्या कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं असल्याचा दावा अनेक कंपन्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. त्यामुळेच पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार कलम ४३, ६६ आणि ६६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम ६३ हे कॉपीराइट कायदा म्हणजेच स्वामित्व हक्क उल्लंघनाविरोधातील कायदा आहे. तसेच भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसीच्या कलम ४२० अर्थात फसवणुकीच्या गुन्ह्याखालीही तक्रार दाखल करण्यात आलीय.
क्लिक करा

0 टिप्पण्या
Please Comment Below 👇