भारतातील पहिले बौद्ध स्तूप कोलकत्ता नामकरण
२३ डिसेंबर दिनविशेष
राष्ट्रीय शेतकरी दिवस
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा किंवा बरसत असो पावसाच्या ओल्याचिंब धारा तरी राबतो आपला सर्जाराजा.
भारतातील पहिला विमान कारखाना
भारतातील पहिला विमान कारखाना.!
२३ डिसेंबर १९४० रोजी भारतातील पहिला विमान कारखाना HAL हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड द्वारा बंगळुरू येथे उभारला गेला. हा कारखाना उभारणारे वालचंद हिराचंद दोशी , हे एक भारतीय उधोगपती आणि वालचंद समूहाचे संस्थापक होते. त्यांनी पहिल्या विमान कारखान्यासह भारतातील पहिले आधुनिक शिपयार्ड आणि प्रथम कार कारखाना ही स्थापित केला.
जगातील सर्वात उंच बौध्द स्तूप
२३ डिसेंबर २००१ रोजी उत्खननात सापडले ले बौध्द स्तूप हे जगातील सर्वाति उंच स्तूप आहे. ज्याची उंची १०४ फिट आहे. हे बौध्द स्तूप बिहार मधील केसरिया या ठिकाणी स्थित आहे. याचे बांधकाम हे इसविसनपूर्व ३ या शतकात झाले होते.
कोलकत्ता चे नामकरण
कोलकत्ता चे नामकरण
२३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या भूतपूर्व राजधानी कोलकाता चे नाव हे बदलण्यात आले, जिचे आधीचे नाव कलकत्ता (बंगाली भाषेत : कालिकाता ) हे होते. कोलकाता ही पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आणि ब्रिटिश भारताची पूर्वीची राजधानी (१७७२-१९११) होती. कोलकता है भारतातील सर्वात मोठे शहर आणि त्याच्या प्रमुख बंदरांपैकी एक आहे.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇