4 December Dinvishesh | ४ डिसेंबर दिनविशेष

04 December Dinvishesh | ०४ डिसेंबर दिनविशेष

INDIAN NAVY DAY

Father of Indian navy, chhtrapati shiwaji Maharaj

शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हटले जाते ?

इसवीसनाच्या ४-५व्या शतकापासून पुढचे १००० वर्ष भारतामध्ये नौदलाचा विचारच झाला नाही. त्याकाळात भारतात मुस्लिमांनी आक्रमण केले, पण मुस्लिमांना देखील त्याबद्दल जास्त ज्ञान नव्हते. पण शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा इंग्रज आणि पोर्तुगीजांनी भारतात आक्रमण केले तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी महाराजांनी नौदलाचा विचार केला.तत्कालीन काळात इंग्रज-पोर्तुगीजांबरोबरच अरबी लोकं देखील व्यापारासाठी महाराष्ट्रात यायचे. महाराष्ट्रात येऊन इथल्या स्त्रियांवर अत्याचार करायचे, त्यांना पळवून नेऊन समुद्रात अत्याचार करायचे. इथले लोकं जेव्हा त्यांचा पाठलाग करायचे तेव्हा धर्मशास्त्र-नीतीशास्त्र आडवं यायचं. धर्मशास्त्र सांगायचं की हिंदू व्यक्ती समुद्रात फक्त ५ मैलच जाऊ शकतो, याचा फायदा अरबी लोकं घ्यायचे आणी ६-७ मैलावर जाऊन स्त्रियांची अब्रू लुटायचे.महाराजांनी उपाय करण्याचं ठरवलं. आणि स्वराज्यातील मुस्लिम मावळ्यांच्या मदतीने त्यांपैकी २०० अरब पकडले. त्यांना *साताऱ्यातील कासोट्याच्या किल्ल्यावर* नेऊन एवढे मारले की फक्त मरू दिले नाही. ८ दिवस बेदम मारल्यानंतर / सुजवल्यानंतर त्यांच्या जहाजात बसवुन परत पाठवले. याचा परिणाम झाला असा की तत्कालीन काळात अरबी लोकांचं महाराष्ट्रात येणचं बंद झालं, कोणी निघाला तरी ते त्याला जाऊ देत नसत.पण महाराजांनी विचार केला की तात्पुरती सोय तर झाली पण काही दिवसांनी आपल्यानंतर पुन्हा असाच प्रकार सुरू झाला तर????
म्हणून काहीतरी कायमास्वरूपी उपाय करावा लागेल. म्हणून महाराजांनी *दर्यासारंग भंडारीला* सोबत घेऊन समुद्रात गलबत बांधायला सुरुवात केली. गलबत बांधली पण त्यांच्या बांधणी करण्यात मजबुती नसल्याने ते समुद्रात गेल्यावर स्थिर चालत नव्हते.म्हणून महाराजांनी स्वतः जहाज बांधणी करण्याच्या कारखान्यात जाऊन आपल्या मार्गदर्शना खाली एक जहाज/गलबत बनवले, आणि ते गलबत जेव्हा समुद्रात गेलं तेव्हा कितीही दाब पडला तरीही ते जहाज हालत नव्हते. तसेच शत्रूंना समुद्रातूनच परत हाकलून लावण्यासाठी त्यांनी समुद्रात देखील जंजिरा-सिंधुदुर्ग यांसारखे किल्ले बांधले. जेणेकरून पुढील ३५० वर्ष महाराष्ट्रावर जलमार्गाने आक्रमण झाले नाही. 

म्हणूनच आपण महाराजांना Father Of Indian Navy म्हणतो
📠 Written by Tejas Ranabawale
WhatsApp

भारतीय नौदलाचे जनक

father of Indian Ocean, Shivaji Maharaj, techunger, Saurabh Chaudhari, 4 December Dinvishesh
छत्रपति शिवाजी महाराज यांनी १६५९ मध्ये आरमार उभारणीला सुरुवात केली. ज्याचा मुख्य उद्देश परकीय आक्रमण व व्यापार यांपासून संरक्षण हा होता.
इतिहास साक्षी आहे की राजांच्या आरमार उभारणी नंतर जवळपास ३०० वर्ष समुद्री मार्गाने होणाऱ्या हल्यांपासून 
महाराष्ट्र सुरक्षित होता.
WhatsApp
Download

Father of Indian navy

Father of Indian navy chhtrapati shiwaji Maharaj
Indian navy day
Indian navy day, India,
Xera tech banner on navy day

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please Comment Below 👇