वीर सावरकर साने गुरुजी जन्मदिन सावरकरांचे मराठी शब्द
आजचा इतिहास
DOWNLOAD Create Your Banner
आज २४ डिसेंबर, हाच तो दिवस ज्या दिवशी इतिहासात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली
SHARE Copyकाळ्या पाण्याची शिक्षा
DOWNLOAD Create Your Banner
वीर सावरकर आज २४ डिसेबर, याच दिवशी १९१० साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमान येथील तुरुंगात ब्रिटिशांद्वारे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
SHARE Copyजन्मदिन: साने गुरुजी
DOWNLOAD Create Your Banner
*जन्मदिन: साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने २४ डिसेंबर १८९९* ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.
SHARE Copyसाने गुरुजी जन्मदिन विशेष
DOWNLOAD Create Your Banner
*साने गुरुजी जन्मदिन विशेष* साने गुरुजी यांचे श्यामची आई हे पुस्तक अतिशय सूप्रसिध्द आहे याच नावाच्या कादंबरीवर आधारित मराठी भाषेतील चित्रपट १९५३ साली पडद्यावर झऴकला. तसेच १९५५ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
SHARE Copyतुम्हाला माहीत आहे काय ?
DOWNLOAD Create Your Banner
नाशिकच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषेतील अनेक शब्दांचा शोध लावला जे आपण रोज वापरात घेतो. उदाहरणार्थः दिनांक, नगरपालिका, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत.
SHARE Copyस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
DOWNLOAD Create Your Banner
मराठी भाषा जपण्यासाठी शुद्ध मराठी जगणं आणि शुद्ध मराठी बोलणं याच्याशिवाय सगळं करणारा समाज आजही आपण पाहतो. असाच समाज सावरकरांच्या काळातही होता. ‘ स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं , स्वतः च्या मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे , तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला वगळून इंग्रजी , फारशी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे , म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का ?, असा प्रश्न सावरकरांनी उपस्थित केला आणि अनेक पर-शब्दांना मराठमोळे प्रतिशब्द सुचवले. हे शब्द किचकट होते, संस्कृतप्रचूर होते आणि समजायला परभाषी शब्दांपेक्षाही कठीण होते अशी टीका काहीजण करतात. पण दिनांक, नगरपालिका, महापालिका, महापौर, हुतात्मा, दूरदर्शन, दूरध्वनी, प्राध्यापक, नेतृत्त्व हे सावकरांनीच शोधलेले, सुचवलेले शब्द आहेत. आज ते सर्रास वापरले जातात. मराठी भाषेचं सौंदर्यही त्यातून जाणवतं.
SHARE Copyदिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला.
SHAREवीर सावरकर
#onthisday
DOWNLOAD Create Your Banner
मुहिब्बाने वतन होंगे हजारो बेवतन पहले फलेगा हिंद पीछे और भरेंगा अंदमन पहले
- विनायक दामोदर सावरकर.
0 टिप्पण्या
Please Comment Below 👇