TecHunger post 10 November 2020

TecHunger Daily Post
10 November 2020

Posters made by saurabh chaudhari

Premium services available

Click download button to get images

If any problem in downloading click me

If you having any suggestions click me


You can also submit your posters and images

👆🏻 Submit your images👆🏻

अफजल खान वध १० नोव्हेंबर १६५९

अफजल खान वध पोस्टर, afjal khan, shiwaji Maharaj, shiwaji Maharaj poster, techunger post, saurabh chaudhari



छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग अदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी छत्रपती शिवाजींचे थोरले बंधूसंभाजी यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजी महाराजांचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. शिवाजी महाराजांनी खान येत आहे सुद्धा, बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी महाराज चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती.
शिवाजी महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलावणे धाडले, पण शिवाजी महाराजांनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजी महाराजांनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्याबाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ नोव्हेंबर १० इ.स. १६५९ रोजी ठरली.

भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजी महाराजांनी जाणूनबूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजी महाराजांनी १०० टक्के धरली होती त्यामुळे त्यांनी अंगरख्याखाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजी महाराजांना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजी महाराजांना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजी महाराजांनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर वार केला परंतु तो जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजी महाराजांचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणाऱ्या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजी महाराजांनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले. शिवाजी महाराजांनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले.



मराठी सुविचार
Marathi quote, मराठी सुविचार, techunger, saurabh chaudhari


मराठी सुविचार
Marathi quote, मराठी सुविचार, techunger post, saurabh chaudhari


   

Add your image

❤️ 

Add your image

❤️ 
   

Thank you for visiting us

We hope you like this

We are Working to serve you best

If you want get social media posts for market and attract costumers, contact us we can make posts for your business , not only post we are making product promotional images and videos for better understanding of your business

👇👇👇👇👇👇


Visit again
       
   www.techunger.com


अफजल खान वध पोस्टर, afjal khan, shiwaji Maharaj, shiwaji Maharaj poster, techunger post, saurabh chaudhari



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या